Realme Smartphones : Realme सतत आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी Realme C33 नावाचा एक स्वस्त डिवाइस सादर केला होता, त्यानंतर कंपनीने आपले दोन मोठे मोबाईल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. एकीकडे, कंपनी 14 सप्टेंबरला Realme C30s भारतात सादर करेल, तर आता कंपनीने खुलासा केला आहे की Realme चा एक अतिशय मजबूत डिवाइस 16 सप्टेंबरला दाखल होईल.
कंपनी हा फोन Realme GT NEO 3T 5G या नावाने सादर करेल. नावाप्रमाणेच कंपनी यामध्ये 5G तंत्रज्ञान देणार आहे. यासोबतच यात दमदार फीचर्सही मिळणार आहेत. आज आम्ही तुम्हाला डिव्हाइसच्या लॉन्चिंग, फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

Realme GT NEO 3T लाँच वेळ
कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे Realme GT NEO 3T 5G डिव्हाइस लॉन्च करण्याविषयी माहिती दिली आहे. यासोबतच कंपनीने मीडिया निमंत्रणेही पाठवण्यास सुरुवात केली आहे. फोनच्या लॉन्चसह, कंपनी NEO 3T सीरीजचा विस्तार करत आहे. लॉन्च डेटबद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता लॉन्च होईल. सोशल मीडियावर समोर आलेल्या माहितीनुसार, हे डिव्हाइस Realme फेस्टिव्ह डेजच्या निमित्ताने समोर येणार आहे. हा कार्यक्रम 8 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Every detail is inspired by the iconic racing flag design which carries the spirit of racing and speed!
Introducing #realmeGTNeo3T, your pathway to speed.
Launching on 16th September, 12:30 pm.#NEOSpeedAwakens
Know more: https://t.co/k3ruJqn3BC pic.twitter.com/3ev4CmWiYc
— realme (@realmeIndia) September 8, 2022
Realme GT NEO 3T चे फीचर्स
कंपनीने डिवाइस बद्दल काही विशिष्ट माहिती देखील सादर केली आहे. कंपनीचे प्रोडक्ट लाईव्ह पेज बघितले तर फीचर्स समोर आले आहेत. फोनच्या टीझर इमेजवरून हे स्पष्ट झाले आहे की यामध्ये 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की Realme GT NEO 3T डिव्हाइस फक्त 12 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये Qualcomm Snapdragon 870 5G चिपसेट वापरला जाईल.
फोनच्या कॅमेर्याबाबत असे सांगण्यात आले आहे की Realme GT NEO 3T मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. मात्र, कॅमेऱ्याच्या लेन्सबाबत माहिती मिळालेली नाही. त्याच वेळी, फोनच्या किंमतीबद्दल असे सांगितले जात आहे की हा डिवाइस सुमारे 20 हजार रुपयांमध्ये ऑफर केला जाऊ शकतो.