Maharashtra News:कोरोनाच्या काळात संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जसे माणसांसाठी अनेक निर्बंध लादण्यात आले होते, तसे आता लम्पी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी जनावरांसाठी लागू करण्यात आले आहेत.
जनावरांचे बाजार, वाहतूक, चारा, प्रदर्शन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदिश गुप्ता यांनी हा आदेश दिला आङे. राज्यातील १७ जिल्ह्यांत आतापर्यंत या रोगाचा फैलाव झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश तालुक्यात या रोगाचा ससंर्ग आढळून आला आहे. पशुसंर्वन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधी आढावा बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. कोरोना काळात जसे निर्बंध लादण्यात आले होते,
तसे आता लम्पी चर्म रोगाची साखळी तोडण्यासाठी जनावरांसाठी लागू करण्यात आले आहेत. राज्यभर जनावरांची वाहतूक,
ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे राज्यात एका भागातून दुसऱ्या भागात जनावरे ने-आण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लम्पी रोगग्रस्त जनावर किंवा मृत जनावर यांच्या संपर्कात आलेली वैरण, गवत आणि अन्य साहित्य, प्राण्याचे शव, कातडी, जनावरांचे बाजार, शर्यती, जत्रा, प्रदर्शन यावरही ही बंदी घालण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.