Ahmednagar News:अनेकदा लग्नाच्या वेळी आम्हाला काही नको सर्व काही आहे. अशा प्रकारे बढाया मारतात अन अवघ्या काही दिवसातच आपले असली रूप1 मुलीच्या घरच्यांना दाखवतात. असाच प्रकार नगर तालुक्यात घडला आहे.
गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला मारहाण करत शारिरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासु, ननंद आणि नंदेचा पती यांच्याविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती नंदु माणिक ठोंबरे, सासु कमल माणिक ठोंबरे (दोघे रा. पनवेल, रायगड), ननंद आशा बाळु कराळे आणि बाळू अर्जुन कराळे (दोघे रा. निंबोडी, ता. जि. अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पिडीतेचे १९ जानेवारी २०२० रोजी पती नंदु ठोंबरेसोबत विवाह झाला होता. विवाहनंतर आरोपींनी १५ दिवस व्यवस्थित नांदवले व त्यानंतर त्रास देण्यास सुरूवात केली.
आरोपी गाडीचे टायर बदली करण्यासाठी व नवीन गाडी घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रूपये आणण्याची मागणी करत होते.
भावाचे शिक्षण आणि लग्नासाठी पैसे खर्च झाल्याचे त्यांना सांगितले असता आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पिडीतेचा शारिरिक व मानसिक छळ केला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.