पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवक युवतींची फसवणुक केली !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नगर शहरात, कोठला चौक, परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगार दिवस म्हणून साजरा करुन आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की देशात व राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी अत्यंत भिषण रूप धारण करीत आहे.

राज्यात कोणतेही नवीन उदयोग आलेले नाहीत. तसेच नगर जिल्हयात सुध्दा कोणत्याही तरूणांना रोजगार उपलब्ध होईल असा प्रकल्प उभा राहीला नाही. तरूण-तरूणी उच्च शिक्षण घेऊनही दिशाहिन झालेला आहे.

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष बी.वी. श्रीनीवास, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, अखिल भारतीय युवक काँग्रेस सचिव व उत्तर महाराष्ट्र प्रभारी वंदनाताई बेन यांच्या नेतृत्वात आजचा युवक निश्चितच बदल घडवील यांत शंका नाही.

पंतप्रधान यांनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकरी मिळवून देऊ असे सांगितले होते. परंतु त्यांनी तरूणाची फसवणुक केली. असे प्रशांत ओगले म्हणाले. तसेच नगर शहर जिल्हा युवक अध्यक्ष मोसिम शेख यांनी म्हटले की ना. बाळासाहेब थोरात प्रदेश युवक अध्यक्ष – कुणाल राऊत, उपाध्यक्ष – प्रशांत ओगले यांच्या प्रयत्नातून नगर जिल्हयात अत्यंत चांगले प्रकल्प आणण्याकरीता आम्ही कटीबध्द असून त्यात कोणतीही शंका नाही.

या पुढील काळात युवक काँग्रेस अत्यंत आक्रमकपणे युवकांच्या रोजगारा करीता प्रयत्नशील असणार आहे. या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले,शहर जिल्हा अध्यक्ष मोसिम शेख,

बाळासाहेब भंडारी, शामराव वाघस्कर, प्रशांत सिदनकर, तन्वीर पठाण, हर्षवर्धन देशमुख, भूषण चव्हाण, सागर इरमल, महेश चव्हाण, प्रतिक सकट, विशाल धोंडे, अतुल काळोखे,

ज्ञानेश्वर आव्हाड, जुनेद शेख, नईम सरदार, तौफीक शेख, स्वप्नील वारुळे, नियार शेख, आकाश सुर्यवंशी, विशाल चव्हाण, विशाल घोलप आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe