Ahmednagar Politics : अगोदर स्वकर्तुत्वाने तालुक्यात नवीन तलाव, धरणे बांधावीत व मगच हक्काने जलपुजन करावे.असा टोला जि.प.मा.उपाध्यक्ष सुजित पा.झावरे यांनी कोणाचे नाव न घेता आजी माजी आमदारांना लगावला आहे.
पारनेर तालुक्यातील तलाव भरल्याने त्याचे जलपूजन सुजित पा.झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की,तिखोलचा पाझर तलाव तालुक्यात सर्वात मोठा पाझर तलाव असून तिखोल, काकणेवाडी व परिसराला वरदान ठरणारा आहे.
परिसरातील सुमारे एक हजार एकर क्षेत्र या तलावामुळे ओलिताखाली येते. तालुक्यामध्ये रोजच जलपूजनाचे कार्यक्रम होत आहेत. तालुक्यात मांडओहोळसारखे मोठे तलाव स्व. शंकरराव काळे तर. स्व. वसंतराव झावरे यांच्या काळात काळू सारखा मोठा प्रकल्प झाला तसेच भांडगाव,सावरगाव, वडझिरे येथील मोठे तलाव अशी तालुक्याला दिशा देणारी कामे वसंतराव झावरे यांच्या काळात तालुक्यात झाली. जलपूजनाची ज्यांना हौस आहे त्या सगळ्यांनी साडेसतरा वर्षात एकही प्रकल्प केला नाही.
आपण धरण बांधावे आणि मग जलपूजन करावे. पारनेर तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. धरणे-बंधारे ओव्हरफ्लो झाले. तलाव ओसंडून वाहत असताना आता त्या पाण्याच्या जलपुजनावरून पारनेर तालुयात राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी तालुयात गेल्या साडेसतरा वर्षात जलसंधारणाचा एकही मोठा प्रकल्प झाला नसल्याचा आरोप करताना थेट आजी माजी आमदारांवर निशाणा साधला आहे.