पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतच प्रमुख आरोपी, ईडीचे दोषारोपपत्र

Published on -

Maharashtra News:मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने ४ हजार पानी आरोपपत्र दाखल असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच यातील प्रमुख आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आहे. मात्र त्यांचे नाव अद्याप समोर आले नाही. त्यावरून अनेक तर्कवितरक लावण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही चौकशी करावी,

अशी मागणी भाजपने केली आहे. दोषारोपपत्र म्हटले आहे की, २००६-२००७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यामध्ये बैठक झाली. या बैठकीनंतरच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळच्या विकसनाचे काम देण्यात आले.

पुढे याच कामात १ हजार ३४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील घडामोडींची माहिती संजय राऊत यांना होती. तेच याचे सूत्रधार आहेत. त्यांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असेही दोषारोपपत्रात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News