Ahmednagar News:अवघ्या जगाला ठप्प करणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाउनमध्ये सर्व प्रकारच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या.
परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकजण बेरोजगार झाले. पर्यायाने अनेकांनी शहर सोडून गावचा रस्ता धरला. गावात शेती करताना अनेक अडचणींचा सामना करत श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील एका तरुणाने योग्य नियोजन करत अवघ्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड करून केवळ सात महिन्याच्या कालावधीत ३० टन डाळिंबाचे विक्रमी उत्पादन चम्हणजे १८ लाख रुपये कमावले आहे.
नवनाथ दिगंबर विधाते असे या तरुणाचे नाव आहे. विधाते दीड एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली होती. चालू वर्षी दीड एकरावरील डाळिंबाच्या एक झाडाला सरासरी ४० ते ४५ किलो डाळिंबाचे उत्पन्न निघत एकूण ७०० झाडांवर ३० टन डाळिंबाचे विक्रमी उत्पन्न निघाले.
या डाळिंबाला कलकत्ता येथील व्यापाऱ्याने दिलेल्या ७० ते १०० रू प्रती किलो बाजार भावामुळे १८ लाख कमावले. या डाळिंबाला औषध, खते तसेच मजुरीसाठी अवघा २ लाख रुपये खर्च आला. याकामी त्याला कुटुंबातील सदस्यांची मोलाची मदत मिळाली.