Cotton price : चिंताजनक! कापसाच्या बाजारभावात होणार घसरण, 30 ते 33 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

Published on -

Cotton price : कापसाच्या (Cotton) कमी उत्पादनामुळे (Cotton less production) बाजारपेठेत कापसाच्या दरात (Cotton rate) घसरण होऊ शकते. बाजारपेठेत (Market) कापसाला 8 हजार ते 8500 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव अपेक्षित आहे.

पुन्हा एकदा पांढरे सोने (White gold) संकटात येऊ शकते. कापसाचे दर उतरु लागल्याने वस्त्र उद्योगाला (Clothing industry) नवी चिंता सतावू शकते.

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी याबाबत माहिती दिली. भारत (India) आणि पाकिस्तानमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तर चीनमध्ये दुष्काळामुळे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा होती.

तर कापसाचे भाव गडगडले आहेत. बाजारात झपाट्याने घसरण सुरू झाली, सध्या पंजाब (Punjab), हरियाणाच्या बाजारात कापसाची आवक सुरू झाली आहे, जिथे सुरुवातीला 9 हजार ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता.

कापसाला 8500 किंमत मिळू शकते

सध्याचे भाव स्थिर राहिल्यास देशात 8 हजार ते 8500 भाव मिळू शकतात, मंदीमुळे ते आणखी खाली आले तर कापसाच्या दरावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News