‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेत सत्तार यांची वेगळीच गर्जना!

Published on -

Maharashtra News:राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नव्या सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून धडाकेबाज विधानासंबंधी सतत चर्चेत आहेत.

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेदरम्यान त्यांनी असेच आणखी एक वक्तव्य केले आहे. आपल्या निवडणुकीच्या आत्मविश्वासाबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो.

’ मात्र यावरून आता त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, ‘माझ्या सिल्लोड मतदारसंघात सव्वातीन लाख हिंदू मतदार आहेत तर ५० हजार मुस्लिम मतदार आहेत.

मी मुस्लिम असूनसुद्धा गेल्या २५ वर्षांपासून निवडून येत आलो आहे. मला जर ‘कुत्रा’ निशाणीवर उभे केले तरीही मीच निवडून येतो कारण की कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो,’

सत्तार यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावर तेच पुढे म्हणाले, ‘मी अगोदर काँग्रेसमध्ये होतो. नंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत आलो. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने शिंदे यांनी आम्हा ४० जणांना घेऊन भाजप सोबत सरकार स्थापन केले.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News