7th Pay Commission DA Hike : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने (Central Govt) डीए (DA) मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण हे कर्मचारी बऱ्याच दिवसापासून महागाई भत्त्याची (Dearness allowances) वाट पाहत होते.
DA किती वाढेल
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, सरकारने डीएमध्ये 4 टक्के दराने वाढ (Increase in DA) करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपासून नवीन महागाई भत्ता जोडल्यानंतर पगार मिळेल.
28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी याची घोषणा करणार आहे. त्याची अधिसूचनाही त्याच दिवशी संध्याकाळी जारी केली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली जाईल.
डीए 38% असेल
या डीए वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. ही वाढ 1 जुलै 2022 पासून प्रभावी मानली जाईल. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून डीए वाढवण्याची मागणी करत होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही दोन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. ही थकबाकी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी असेल.
पगार इतका वाढेल
7 व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. 38 टक्के डीए वाढीनुसार, 18,000 रुपयांच्या मूळ वेतनावरील वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपये वाढ होणार आहे.
एका महिन्यात 720 वाढेल. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये असेल. त्याच वेळी, महिन्यात एकूण 2276 रुपयांची वाढ होईल.