Passport Rules : पासपोर्टबाबत (Passport) सरकारने (government) मोठा बदल केला आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना (applying for passport) दिलासा मिळाला आहे, आता पासपोर्ट मिळवणे आणखी सोपे होणार आहे.
आता पासपोर्ट अर्जदार सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस सेवा केंद्रांवर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) साठी अर्ज करू शकतील. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. पासपोर्ट मिळविण्यासाठी पीसीसी ही एक आवश्यक स्टेप आहे, ज्यासाठी अर्जदारांना खूप वेळ लागतो, परंतु आता या प्रक्रियेला जास्त वेळ लागणार नाही.
28 सप्टेंबरपासून हा नवा नियम लागू होणार आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पासपोर्ट बनवण्यासाठी पीसीसीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे अर्जदारांसाठी ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (POPSK) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे लोकांना पासपोर्ट काढणे सोपे होणार आहे. तसेच लोकांना PCC अपॉइंटमेंट स्लॉट आणि पूर्वीची तारीख मिळण्याची शक्यता देखील वाढेल. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, “नागरिककेंद्रित सेवा वितरणाच्या दिशेने आणखी एक प्रयत्न.
पोलीस क्लिअरन्स सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा भारतभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांवर बुधवार,28 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध असेल. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की मंत्रालयाने केलेल्या या कारवाईचा फायदा केवळ परदेशात नोकरी शोधणाऱ्या लोकांनाच होणार नाही तर शिक्षण, दीर्घकालीन व्हिसासह इतर पीसीसी आवश्यकतांची पूर्तता होईल.