एकनाथ शिंदेंनाही करायची होती काँग्रेस-राष्टवादीशी युती, या नेत्याचा गौप्यस्फोट

Published on -

Maharashtra News:सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते.

त्यांना आम्ही आधी राष्ट्रवादीशी चर्चा करण्यास सांगितले होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. यामुळे शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंडखोरी केली,

या दाव्याबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने आपण शिवसेनेतून बाहेर पडलो, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो.

त्याला छेद देणारी माहिती चव्हाण यांनी उघड केली आहे. चव्हाण म्हणाले. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ आले होते. त्यांनी हा प्रस्ताव दिला होता.

त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं.

त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाणांच्या या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे गेलेही असतील. पण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं, असे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News