Bigg Boss : ‘या’ कलाकारांनी गाजवले होते बिग बॉस, आजही दोघांच्या मृत्यूचे गूढ कायम

Published on -

Bigg Boss : देशातील बिग बॉस हा सर्वात प्रसिध्द शो (Popular show) आहे. अनेक वर्षांपासून शो ने लोकांचा मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.अनेकांची या शो (Bigg Boss Show) मुळे वेगळी ओळख तयार झाली आहे.

आता पुन्हा एकदा या शोचा नवीन सीझन (Bigg Boss New Season) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या आधीच्या शोमध्ये काही कलाकारांनी एक वेगळी ओळख तयार केली होती. परंतु, हे कलाकार आज आपल्यात नाही.

बिग बॉसचे हे स्टार्स आता राहिले नाहीत

यापैकी अनेक स्टार्सनी चाहत्यांच्या हृदयात इतकं खास स्थान निर्माण केलं होतं की जगाचा निरोप घेतल्यानंतरही ते लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. अशा स्थितीत बिग बॉसच्या नव्या सिझनच्या सुरुवातीला या जगात नसलेल्या स्टार्सची आठवण चाहत्यांनी करणे अत्यावश्यक आहे, कारण या स्टार्सनी आपल्या मजेशीर स्टाइलने शोमध्ये भर घातली होती, पण, ते जीवनाची लढाई हरले. 

राजू श्रीवास्तव

कॉमेडीच्या दुनियेवर राज्य करणारा राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) बिग बॉसचा भागही राहिला आहे. राजू श्रीवास्तव बिग बॉस सीझन 3 मध्ये दिसला होता. शोमध्ये त्याने आपल्या फनी स्टाइलने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. 

मात्र दीर्घ आजारानंतर राजू श्रीवास्तव यांनी काही दिवसांपूर्वी 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्समध्ये 42 दिवस राहिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. राजू यांच्या निधनाने त्यांच्या सर्व चाहत्यांची मनं तुटली आहेत.

सिद्धार्थ शुक्ला

बिग बॉसचे नाव ऐकल्यानंतर जर कोणत्याही स्पर्धकाचे नाव मनात येत असेल तर ते आहे सिद्धार्थ शुक्ला. सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सीझन 13 मधील सर्वात शक्तिशाली आणि आवडता खेळाडू होता. सिद्धार्थने त्याच्या बुद्धिमत्तेने शोमध्ये भर घातली होती.

सिद्धार्थसाठी चाहत्यांची क्रेझ सातव्या आकाशावर राहिली. पण, बिग बॉसचा हा चमकणारा स्टार आता आपल्यात नाही. आजही सिद्धार्थला आठवून लोकांचे डोळे ओले होतात. सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला असला तरी तो नेहमीच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करेल.

सोनाली फोगट

बिग बॉस 14 ची स्पर्धक सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे निधन झाल्याची बातमी येताच सोनाली फोगटच्या चाहत्यांना धक्का बसला. बिग बॉस फेम सोनाली फोगटने वयाच्या 42 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सोनालीने बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री केली होती, ती अल्पावधीतच चाहत्यांची आवडती बनली होती. 

सोनालीने तिच्या डान्स आणि फॅशन सेन्सने सर्वांची मने जिंकली. पण , आता सोनाली आपल्यात नाही. सोनालीचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरू आहे. अंमली पदार्थांचे ओव्हरडोस, खुनाचे नियोजन, असे सर्व दावे केले जात आहेत पण नेमके कारण काय हे समोर आलेले नाही. 

प्रत्युषा बॅनर्जी

टीव्हीच्या आनंदी बहू म्हणजेच प्रत्युषा बॅनर्जीने बिग बॉस शोमध्ये प्रवेश केला तेव्हा चाहत्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. 2013 मध्ये प्रत्युषा बॅनर्जी बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसली होती. पण या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर 3 वर्षांनी प्रत्युषा बॅनर्जीचा मृत्यू झाला.

2016 मध्ये प्रत्युषा बॅनर्जी तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्रीची तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला होता. पण आजपर्यंत प्रत्युषाचे अचानक जाणे कोणालाच समजले नाही.

जेड गुडी

हॉलिवूड टेलिव्हिजन स्टार जेड गुडी देखील बिग बॉसचा भाग आहे. ती सीझन 2 मध्ये सामील होती. मात्र नंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. गुडीने फेब्रुवारी 2009 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

स्वामी ओम

बिग बॉस 10 चे स्पर्धक स्वामी ओम आता आपल्यात नाहीत. गेल्या वर्षी कोविड-19 मुळे स्वामी ओम यांचे निधन झाले. स्वामी ओमने बिग बॉसमध्ये आपले वेगळे रूप दाखवले. या शोमधून त्याला मोठी ओळख मिळाली.

पण तेही आता आपल्यात नाही हे जड अंतःकरणाने सांगावे लागेल. बिग बॉसचे स्टार्स आता या जगात नसले तरी शोच्या इतिहासात त्यांचे नाव नेहमीच चमकत राहील. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe