धक्कादायक : पोलिस महासंचालकांची गळा चिरून हत्या

Ahilyanagarlive24 office
Published:

Jammu and Kashmir:जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या मदतनीसावर पोलिसांचा संशय असून तो फरारी आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हेमंत लोहिया दोन महिन्यांपूर्वीच पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन) झाले होते.

ते १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शहराबाहेरील त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळून आला. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचे आढळले आहे. तसेच त्यांच्या पायाला सूज असल्याचेही दिसून आले.

त्यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आल्याचे दिसते. त्यानंतर त्यांना गुदमरून ठार करण्यात आले. केचअपच्या बॉटलच्या तुकड्याने गळा चिरण्यात आला आहे. याशिवाय मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe