मोठी बातमी! पुणे-बंगळूर महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनीसाठी चारपट अधिक मोबदला मिळणार; पुणे, सांगली, साताराच्या ‘या’ गावातून महामार्ग जाणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Bengaluru Greenfield Expressway : मित्रांनो देशात भारतमाला परीयोजनेअंतर्गत तीन हजार किलोमीटरचे महामार्ग (Expressway) स्थापित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीयोजनेअंतर्गत स्थापित होणारे महामार्ग हे सर्व ग्रीनफिल्ड कॉरिडॉर (Greenfield Corridor) राहणार आहेत.

या प्रकल्पाअंतर्गत पुणे बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे देखील तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग सध्याचा राष्ट्रीय महामार्ग 48 ला (National Expressway) एक पर्यायी महामार्ग (Highway) म्हणून विकसित केला जात आहे. यामुळे पुणे (Pune) ते बेंगलोर हे अंतर कमी होणार आहे. यामुळे पुणे ते बेंगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

या सदर महामार्गावर 120 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने वाहने धावू शकणार आहेत. हा महामार्ग आठ पदरी आणि संपूर्ण डांबरी राहणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पुणे ते बेंगलोर या दोन शहरांमधील अंतर या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे तब्बल 95 किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा चार ते पाच तासांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. सध्याच्या राष्ट्रीय महामार्ग 48 वर प्रवास केला असता प्रवाशांना पुणे ते बंगळुरू एवढा प्रवास करण्यासाठी सुमारे 11 घंटे लागतात.

मात्र या नवीन ग्रीनफिल्ड कॉरिडोरवर प्रवास केल्यास प्रवाशांना सात ते आठ घंटे लागणार आहेत. विशेष म्हणजे या महामार्गावर 2 एअर स्ट्रीप देखील विकसित केल्या जाणार आहेत. म्हणजेच या महामार्गावर विमानाची लँडिंग देखील शक्य होणार आहे. विमानाची धावपट्टी असणारा हा देशातील एकमेव महामार्ग राहणार आहे. मित्रांनो हा महामार्ग पुण्याच्या वारवे बुद्रुक येथून सुरू होणार आहे. महामार्ग पुणे जिल्ह्यातून गेल्यानंतर सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पुढे हा महामार्ग कर्नाटकात जाईल आणि कर्नाटकातून हा महामार्ग बेंगलोर या शहरात जाणार आहे.

मित्रांनो सांगली जिल्ह्यातील खानापूर तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातून हा सदरचा महामार्ग जाणे प्रस्तावित आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण आणि खटाव या तीन तालुक्यातून जाणार आहे. मित्रांनो आता या महामार्गाबाबत एक महत्त्वाचा अपडेट हाती आला आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खानापूर तासगाव मिरज आणि कवठेमहाकाळ या तालुक्यातील भूसंपादन करण्यासाठी खानापूर आणि मिरजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील या गावातून जाणार आहे महामार्ग

  • मित्रांनो हा महामार्ग मिरज तालुक्यात 120.570Km ते 150.100 किमी एवढा राहणार आहे. माहुली, वलखड, वेजेगाव भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या मिरज तालुक्यातील गावातून हा महामार्ग जाणार आहे.
  • मित्रांनो तासगाव तालुक्यात हा महामार्ग 150.100 Km ते 176.740 Km एवढा लांब राहणार आहे. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाण या गावातून हा महामार्ग जाणार आहे.
  • कवठे महांकाळ तालुक्यात हा महामार्ग 176.740 Km ते 196.035 Km एवढा लांब राहणार असून तालुक्यातील बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळी या गावातून हा महामार्ग जाणार आहे.
  • मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावातून देखील हा महामार्ग जाणार आहे. 196.035 Km ते 201.200 Km एवढे या गावातून या महामार्गाची लांबी राहणार आहे.
  • मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात देखील या मार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी या महामार्गबाबत एक महत्त्वाचा अपडेट दिलं आहे. या महामार्गासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चार पट मोबदला दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गालगत अशी नोंद असणाऱ्या जमिनीला दुप्पट मोबदला मिळणार असल्याची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. मित्रांनो, महामार्गाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी अफवा पसरवली जात आहे यामुळे शेतकरी बांधव घाबरून जमिनी दुसऱ्या लोकांना विकत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत खासदार महोदयांनी शेतकऱ्यांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे.

सांगली जिल्ह्यात हा महामार्ग 74 किलोमीटर लांबीचा राहणार असून जिल्ह्यातील 38 गावांना याचा फायदा होणार आहे. मार्कासाठी अधिग्रहित केल्या जाणाऱ्या शेत जमिनीच्या मोबदल्यात अधिग्रहण कायद्याअंतर्गत मोबाईल दिला जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.