गुड न्यूज ! भारतीय बाजारात लॉन्च झाली 170 किलोमीटरची रेंज असणारी ‘ही’ नवीन Electric Scooter ; किंमतही खिशाला परवडणारी, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Electric Scooter : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी डिमांड पहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये वाढला आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशभरातील अनेक दिग्गज कंपन्यांनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपले नवनवीन मॉडेल लाँच केले आहेत. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर वापरकर्त्यांची संख्या आता वाढू लागली आहे.

दरम्यान नजीकच्या भविष्यात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका आघाडीच्या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्मात्या कंपनीने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केले आहे.

iVoomi कंपनीने बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली असून ही Electric Scooter JeetX ZE या नावाने ओळखली जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, ही नव्याने लॉन्च झालेली ई-स्कूटर तीन बॅटरी पॅकमध्ये ऑफर केली जात आहे.

याला 2.1 kWh, 2.5 kWh आणि 3 kWh चे बॅटरी पॅक दिलेले आहेत. ही नव्याने लॉन्च झालेली इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 170 किलोमीटर पर्यंत धावणार असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

म्हणजेच या गाडीची रेंज 170 किलोमीटर एवढी आहे. अजून या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग मात्र सुरू झालेली नाही. अक्षय तृतीया पासून अर्थातच 10 मे पासून JeetX बुकिंग सुरू होणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

पण, अक्षय तृतीयाच्या दिवसापासून या गाडीची बुकिंग सुरू होणार असली तरी याची डिलिव्हरी कधी सुरू होईल हे अजूनही समजू शकलेले नाही. दरम्यान आता आपण या नव्याने लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स आणि किमती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे आहेत फिचर्स अन किंमत काय ?

ही इलेक्ट्रिक स्कूटर आठ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होणार आहे. नार्डो ग्रे, इम्पीरियल रेड, अर्बन ग्रीन, पर्ल रोज, प्रीमियम गोल्ड, सेरुलियन ब्लू, मॉर्निंग सिल्व्हर आणि शॅडो ब्राउन या कलर ऑप्शन मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यात आली असल्याने ग्राहकांना आपला मनपसंद कलर खरेदी करता येणार आहे.

स्कूटरचा व्हीलबेस 1,350mm एवढा आहे. स्कूटरची लांबी 760 मिमी. आणि सीटची उंची 770 मिमी आहे. फ्लोअरबोर्डवर पुरेशी जागा आणि बूट स्पेस देखील चांगले आहे. या स्कूटरमध्ये एक ॲप्लिकेशन येते, जे ब्लूटूथद्वारे कनेक्ट होऊ शकते.

ते रिकाम्या जागेचे अंतर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखी माहिती दर्शवते आणि जियो-फेंसिंग देखील उपलब्ध आहे.

या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर iVOOMi JeetX ZE ची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच ही गाडी सर्वसामान्यांना परवडणारी ठरणार आहे.