SUV Car Price : भारतात गेल्या काही वर्षांपासून SUV कारला मोठी मागणी आली आहे. सेडान कारच्या तुलनेत एसयूव्ही कारला अधिक पसंती दिली जात आहे. प्रामुख्याने तरुणांमध्ये एसयूव्ही कारची क्रेज पाहायला मिळत आहे. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन एसयुव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे भारतीय कार बाजारात लोकप्रिय असलेल्या एका SUV च्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीप इंडियाने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय कंपास या SUV च्या किमतीत वाढ केली आहे.
कंपनीने या गाडीच्या Sport Manual हे व्हेरिएंट सोडून इतर सर्व व्हेरिएंटच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या लोकप्रिय SUV च्या किमतीत 14,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या लोकप्रिय गाडीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर कंपासची एक्स-शोरूम किमत आता 20.69 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
तसेच, आता या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 32.41 लाख रुपये एवढी झाली आहे. विशेष म्हणजे जीपने या कारचे एक नवीन व्हेरियंट देखील लाँच केले आहे. या कारच्या लाईनअपमध्ये नवीन नाईट ईगल (O2) मॅन्युअल प्रकार जोडला गेला आहे. हे 2.0L टर्बो डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे.
जीपने कंपासचे कोणतेही प्रकार बंद केलेले नाहीत. यामुळे जर तुमचाही नजीकच्या भविष्यात जीपची कंपास ही SUV कार खरेदी करण्याची तयारी असेल तर तुम्हाला आता अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. आता आपण या गाडीच्या नवीन आणि जुन्या किंमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वैरिएंट | जुनी कीमत | किती वाढल्यात किंमती | नवीन कीमत | किमतीतले अंतर % |
Sport Manual | Rs. 20,69,000 | बदल केलेले नाही | Rs. 20,69,000 | 0.00 |
Longitude (O2) Manual | Rs. 24,69,000 | Rs. 14,000 | Rs. 24,83,000 | 0.57 |
Limited (O) Manual | Rs. 26,19,000 | Rs. 14,000 | Rs. 26,33,000 | 0.53 |
Black Shark (O) Manual | Rs. 26,69,000 | Rs. 14,000 | Rs. 26,83,000 | 0.52 |
Model S (O2) Manual | Rs. 28,19,000 | Rs. 14,000 | Rs. 28,33,000 | 0.50 |
Night Eagle (O2) Manual | – | नया वैरिएंट | Rs. 25,18,000 | – |
Longitude (O2) Automatic | Rs. 26,69,000 | Rs. 14,000 | Rs. 26,83,000 | 0.52 |
Limited (O) Automatic | Rs. 28,19,000 | Rs. 14,000 | Rs. 28,33,000 | 0.50 |
Black Shark (O) Automatic | Rs. 28,69,000 | Rs. 14,000 | Rs. 28,83,000 | 0.49 |
Model S (O2) Automatic | Rs. 30,19,000 | Rs. 14,000 | Rs. 30,33,000 | 0.46 |
Model S (O2) 4×4 Automatic | Rs. 32,27,000 | Rs. 14,000 | Rs. 32,41,000 | 0.43 |