Modi Govt:कलम ३७०, तिहेरी तलाक, राम मंदिर यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे पुढील मिशन काय असेल? याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या नागपुरच्या मुख्यालयात संपन्न झाला. त्यावेळी केलेल्या भाषणात मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी बॅटिंग केल्याचे दिसून आले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/10/मोहन-भागवत.jpg)
तेच मोदी सरकारचे पुढील मिशन असल्याचे मानले जात आहे. यावेळी बोलताना भागवत म्हणाले, लोकसंख्येच्या बाबतीत एक व्यापक धोरण लागू करायला हवं. यातून कोणालाच सूट मिळू नये.
आपल्या देशातील तरुणांची संख्या ७० कोटींहून अधिक आहे. आपली लोकसंख्या वाढतेय असं चीनच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी पावलं उचलली.
आपल्या समाजालाही जागरुक व्हायला हवं. नोकरी-चाकरीत एकटं सरकार आणि प्रशान किती रोजगार वाढवणार? समाजानं दुर्लक्ष केल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते, अहे भागवत म्हणाले.