अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लोकनेते आमदार नीलेश लंके हे ज़नतेचे खरे सेवक असून, २४ तास ते ज़नतेसाठी उपलब्ध असतात, असे प्रतिापदन मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. लोकनेते आमदार नीलेश लंके यांचा दि.१० मार्च रोजी वाढदिवस हंगा येथे उत्साहात साजरा झाला.
या वेळी आ. शेळके बोलत होते. आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये डॉ. बाळासाहेब कावरे यांच्या संकल्पनेतून आयोज़ित स्त्रीरोग निदान शिबिरात ३५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजूशेठ औटी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू औटी यांनी आयोज़ित केलेल्या रक्तदान शिबिरात २५१ युवकांनी रक्तदान केले. हंगा जि. प. प्रा. शाळेत आयोजित शिबिरात २०१ युवकांनी रक्तदान केले असल्याची माहिती चंद्रकांत मोढवे यांनी दिली.
हंगा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके होते. या वेळी आ. शेळके म्हणाले, आ. लंके हे २४ तास जनतेसाठी उपलब्ध असतात.
त्यामुळे खऱ्या अर्थाने ते मोबाईल आमदार असून, त्यांनी आपल्या शंभर दिवसांच्या काळात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. सत्काराला उत्तर देताना आ. लंके म्हणाले की, जनतेचे व सहकारी मित्रांचे आपल्यावर अनेक उपकार असून,
तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असून, यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत घेऊन मतदार संघातील कामे मंजूर करून घेऊ.
शेख म्हणाले, आ. लंके यांचे संघटनात्मक कौशल्य वाखाणण्याजोगे असून, ते लवकरच मतदार संघाचा कायापालट करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार शेळके यांच्या हस्ते आ. लंके यांच्या मानधनातून दोन अपंग व्यक्तींना मोफत मोपेड गाडयांचे वाटप करण्यात आले.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लंके यांच्यावर,’ तू चाल पुढं र गडया, तुला भीती कुणाची ‘ ही कविता सादर केली, त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली. या वेळी बाबाजी तरटे, राजेंद्र चौधरी, सुदाम पवार, सतीश पाटील, संजय धामणे, सतीश भालेकर, जितेश सरडे यांची भाषणे झाली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com