7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई भत्त्याची (DearnessAllowances) वाट पाहत आहेत, जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या 4 भत्त्यात वाढ होणार असल्याची सांगितले जात आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार 38 टक्के महागाई भत्ता (DA) मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता (Traveling Allowance) आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि ग्रॅच्युइटीही आपोआप वाढतील. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्यांचा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते.
अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीही वाढण्याची खात्री आहे. इतकेच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (HRA) ही वाढणार आहे. ही वाढ 3 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगण्यात येत आहे.
28 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ केली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 वरून 38 टक्के झाला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 38 टक्के दराने DA आणि DR मिळत आहे.
केंद्र सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना झाला आहे. दरम्यान, 18 महिन्यांच्या थकबाकीसाठी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव वाढवला आहे.
पगार आणि भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो थांबवता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबतही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.