Airtel 5G Plus : Airtel ने 6 ऑक्टोबरपासून अधिकृतपणे 5G Plus सेवा सुरू केली आहे. एअरटेल वापरकर्त्यांना 4G सिम कार्डवरच कोणत्याही अतिरिक्त रिचार्जशिवाय 5G Plus सेवा मिळेल. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी या देशातील 8 शहरांमधील एअरटेल वापरकर्ते या पुढील पिढीच्या 5G सेवेचा आनंद घेऊ शकतील.
कंपनीने सांगितले की, एअरटेल 5G प्लस सेवा या शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने आणली जात आहे. ज्या वापरकर्त्यांकडे 5G सक्षम स्मार्टफोन आहे त्यांना आजपासून 5G सेवा मिळणे सुरू होईल.

HD चित्रपट 1 सेकंदात डाउनलोड होईल
कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून 5G प्लस सेवेबद्दल सांगितले आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, Airtel 5G Plus सेवेमध्ये वापरकर्त्यांना जुन्या 4G प्लॅनवरच 5G सेवा मिळणे सुरू होईल, म्हणजेच वापरकर्त्यांना 5G सेवा वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कंपनीचा दावा आहे की 5G Plus सेवेमध्ये 4G पेक्षा 20 ते 30 पट जास्त स्पीडवर इंटरनेट उपलब्ध होईल. वापरकर्ते केवळ एका सेकंदात कोणताही एचडी चित्रपट डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना NSA (नॉन स्टँड अलोन) 5G सेवा प्रदान करेल. हे तंत्रज्ञान सध्या सर्वाधिक वापरले जाणारे 5G तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये 5G सेवा केवळ 4G स्पेक्ट्रम बँडवर उपलब्ध होऊ शकते. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये व्यावसायिकरित्या 5G चाचणी करणारी एअरटेल ही देशातील पहिली कंपनी आहे.
Here’s our way of ushering in a transformative future. Are you game or ARE YOU GAME? #Airtel pic.twitter.com/4oIGP4PxUU
— airtel India (@airtelindia) October 6, 2022
एअरटेल व्यतिरिक्त, जिओने दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि कोलकाता या चार शहरांमध्ये 5G सेवेची बीटा चाचणी देखील सुरू केली आहे. Jio वापरकर्त्यांसाठी, कंपनीने वेलकम ऑफर जाहीर केली आहे, ज्यामध्ये निवडक वापरकर्त्यांना 1Gbps च्या वेगाने अमर्यादित डेटा ऑफर केला जाईल. जिओ वापरकर्त्यांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. वापरकर्ते जुन्या 4G सिम कार्डवरच 5G सेवेचा आनंद घेऊ शकतील.
तुमच्या फोनमध्ये अशा प्रकारे 5G सक्षम करा
Jio आणि Airtel च्या 5G सेवेमध्ये वापरकर्ते 1Gbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. तथापि, ही सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे 5G सक्षम स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तसेच, तुमच्या डिव्हाइसने 5G बँडला सपोर्ट करणे आवश्यक आहे. Samsung, OnePlus, Realme, Xiaomi, Vivo, Poco, iQOO आणि Oppo चे अनेक 5G फोन बाजारात उपलब्ध आहेत. वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये एक छोटी सेटिंग करावी लागेल, त्यानंतर 5G नेटवर्क उपलब्ध होईल.