WhatsApp Video Calling Permission : देशभरातील अनेक लोक दररोज व्हॉट्सॲप (WhatsApp) वापरत असतात. हे असे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे जे लोकांना एकमेकांसोबत जोडून ठेवण्याचे काम करते.
व्हॉट्सॲपच्या लोकप्रियतेमुळे यावर प्रायव्हसी फीचर्स (Privacy Features) लागू केले आहे. परंतु, जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर (Smartphone) काही चुका करत असाल तर तुमचा फोन हॅक (Hack) होऊ शकतो.
व्हॉट्सॲपवर अनेक प्रायव्हसी फीचर्स आहेत, पण तरीही तुम्ही ते वापरताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंगशी (WhatsApp Video Calling) संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असे सांगितले जात आहे की व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) केल्यानंतरही फोनचा कॅमेरा चालू राहू शकतो, ज्याचा हॅकर्स फायदा घेतात आणि नंतर सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की आपण याबद्दल अनभिज्ञ राहतो आणि आपल्या नकळत सर्व तपशील हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतात.
हॅकर्सना ॲप्सची परवानगी मिळते
तुमच्याकडून झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे WhatsApp हॅक करणे सोपे होते. वास्तविक, जेव्हा तुम्ही Google Play Store वरून व्हिडिओ ॲप डाउनलोड करता तेव्हा काही नियम आणि शर्तींना परवानगी देण्याव्यतिरिक्त, काही परवानग्या द्याव्या लागतात. या एका चुकीमुळे हॅकर्सना तुमची माहिती मिळवणे सोपे होऊ शकते.
अशा परिस्थितीत जेव्हा व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप्सवरून व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा कॉल कट झाल्यानंतरही तो सुरूच राहतो, ज्याचा हॅकर्स गैरफायदा घेतात. फोनचा कॅमेरा तुमच्या नकळत चालू राहतो आणि मग हॅकर्स तुमची माहिती मिळवत असतात.
सुटका कशी?
व्हिडिओ हॅक होऊ नयेत म्हणून लक्षात ठेवा की फोनवर कोणतेही अनावश्यक ॲप डाउनलोड करू नका. एखादे ॲप केले तरी ते स्टोरेज, कॉन्टॅक्ट इ.ला परवानगी देऊ नका. जर तुम्ही असे करत असाल, तर ॲपमधून तुमच्या गोपनीयतेला धोका नाही याची खात्री करा.