Cyber Fraud : स्मार्टफोन (Smartphone) आल्यापासून जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. परंतु, मागील काही दिवसांपासून सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यात (Cyber Fraud Crimes) वाढ होत असल्याचे दिसत आहेत.
अनेक जण या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार (Online transactions) करत असताना काळजी घेणे गरजेचे असते.

या प्रकारचा पासवर्ड निवडू नका
जगभरातील लाखो लोकांना त्यांचे पासवर्ड अतिशय सोपे ठेवायचे आहेत. NordPass ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की लाखो इंटरनेट वापरकर्त्यांचे पासवर्ड कमकुवत (Weak password) असल्यामुळे त्यांचे ऑनलाइन खाते हॅक (Account hack) होण्याचा धोका आहे.
त्यापैकी काही अशा आहेत की क्रॅक करणे हे दुसरे काम असल्याचे सर्वेक्षण अहवालात आढळून आले आहे.असे अनेक लोक आहेत जे 1234, qwerty आणि password असे शब्द पासवर्ड म्हणून वापरतात. जर तुम्हीही या प्रकारचा पासवर्ड वापरत असाल तर तुमच्यासोबत सायबर फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ते ताबडतोब बदलावे.
हे पासवर्ड कधीही वापरू नका
तुम्हाला साधा पासवर्ड (Password) हवा असेल आणि 123456, 123456789, 12345, qwerty, पासवर्ड, 12345678, 111111, 123123, 1234567890, 1234567 सारख्या पासवर्डला प्राधान्य द्यायचे असल्यास तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
संशोधनात असे दिसून आले आहे की अनेक लोक पासवर्ड बनवण्यासाठी त्यांच्या नावासोबत साधे नंबर वापरतात. आपण या प्रकारचे पासवर्ड टाळले पाहिजेत.
मजबूत पासवर्ड
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला असा पासवर्ड सेट करायचा असेल जो क्रॅक करणे कठीण असेल तर तुम्ही तुमचा पासवर्ड किमान 12 अक्षरांचा ठेवावा.लांब पासवर्ड क्रॅक करणे सोपे नसते.
पासवर्डमध्ये नेहमी अप्पर आणि लोअरकेस अक्षरे, संख्या आणि वर्ण यांचे मिश्रण वापरा. सर्व खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. पासवर्ड दर 90 दिवसांनी बदलणे आवश्यक आहे.