‘ती’ चौघे भावंडे आंघोळीसाठी गेली अन् काळाने घात केला

Published on -

लहान तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार भावंडांचा वीजवाहक तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील वांदरकडा येथे घडली.

अनिकेत अरूण बर्डे (वय ८), ओंकार अरुण बर्डे (वय ७), दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. शनिवारी दुपारी ही चौघे मुले तळ्यात आंघोळीसाठी गेली होती. त्याचदरम्यान वीजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. एकाच वेळी व एकाच कुटुंबातील चार चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अनेकांना अश्रु अनावर झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News