Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठविल्याने आणि शिवसेना नाव वापरण्यासही मनाई केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचीही अडचण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची ऑफर दिली आहे. आमदार राणा यांनी ट्विट करून म्हटले आहे की,

शिंदे यांनी गरज पडल्यास माझ्या पक्षाचे चिन्ह असलेले पाना (Spanner) घेऊन आपल्यासोबत उभा राहीन. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावे, अशी ऑफरच राणांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटालाही नवे चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यांच्याकडून तो सुरू झालेला असताना राणा यांनी ही ऑफर दिली आहे.