7th Pay Commission Big Update : सरकारने (government) केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central employees) दिवाळी भेट (Diwali gifts) दिली आहे. 1 जुलै 2022 पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी (central government employees) सरकारने महागाई रिलीफ (DR) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ केली आहे.
हे पण वाचा :- PPF Account : पीपीएफ खातेदाराच्या मृत्यूनंतर पैशाचे काय होते? जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या ऑफिस मेमोरँडमनुसार, डीआर 38 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला, महागाई भत्ता (DA) देखील DR प्रमाणेच टक्केवारीने वाढविण्यात आला होता. याचा फायदा केंद्र सरकारचे कर्मचारी, केंद्र सरकारचे पेन्शनधारक आणि केंद्र सरकारकडून पेन्शन मिळवणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.
याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आर्थिक वर्ष 2021-22 साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) देण्यास मंजुरी दिली. याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार 1,832.09 कोटी रुपये खर्च करत आहे. या सगळ्यामध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार (central government) लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्याचा विचार करत आहे.
हे पण वाचा :- Aadhaar Card: कामाची बातमी ! आधार कार्डमध्ये ‘हे’ काम लवकर करा ; नाहीतर होणार मोठं नुकसान
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो. 1947 पासून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. पहिला आयोग जानेवारी 1946 रोजी स्थापन करण्यात आला होता तर सर्वात अलीकडील, 7 वा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2014 रोजी स्थापन करण्यात आला होता.
दरम्यान, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक 8 व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 8 वा वेतन आयोग स्थापन झाल्यास लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. मात्र, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे केंद्राने म्हटले आहे.
हे पण वाचा :- Home Loan : महागाईत दिलासा ! ‘या’ बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात केली मोठी कपात ; ग्राहकांना मिळत आहे ‘ही’ भन्नाट ऑफर