Dengue Prevention Tips : सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy days) सुरु आहेत आणि पावसाळा म्हटलं की त्यासोबत आजार आलेच. यापैकी जास्त प्रमाणात आढळणारा आजरा म्हणजे डेंग्यू (Dengue).
पावसाळयात अनेकजणांना डेंग्यूची लागण (Dengue infection) होते. परंतु, तुम्ही घरच्या घरी प्लेटलेट्सची (Platelets) संख्या वाढवू शकता. कसे ते जाणून घ्या (Dengue Prevention)

डेंग्यूमध्ये काय खावे आणि प्यावे
द्रव पदार्थांचे सेवन करावे. काढा, हर्बल टी आणि सूपचे सेवन करा. लिंबूपाणी, ताक, लस्सी, नारळपाणी यांसारखे थंड पदार्थ प्लेटलेट्स वाढवतात.
ही फळे खा
संत्री, पेरू, डाळिंब, आवळा, पपई, सफरचंद
डेंग्यू ताप काय आहे
जास्त उष्णता असलेल्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे. हा डास चावल्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार (Viral disease) आहे.
लक्षणे
जास्त ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि सांधेदुखी. गंभीर प्रकरणांमध्ये, गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक येऊ शकतात.
प्लेटलेट्स किती असावेत
सामान्य व्यक्तीचे प्लेटलेट काउंट 150,000 लाख ते 450,000 प्रति मायक्रो-लिटर रक्ताच्या दरम्यान असावे.
डेंग्यू टाळण्यासाठी उपाययोजना
तुमच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका, मच्छरदाणी वापरा, स्वच्छता ठेवा, डास चावण्यापासून रोखण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
ज्याला जास्त धोका आहे
ज्या लोकांना दुसऱ्यांदा विषाणूची लागण झाली आहे त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो.
उपचार
उपचारांमध्ये द्रवपदार्थाचे सेवन आणि वेदना निवारक यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायझेशन केले पाहिजे.
डेंग्यूचा डास
हा विषाणू संक्रमित मादी डासांद्वारे मानवांमध्ये पसरतो, प्रामुख्याने एडिस इजिप्ती डास.
डेंग्यू व्हायरस
या विषाणूला डेंग्यू विषाणू (DENV) म्हणतात, ज्याचे चार DENV सेरोटाइप आहेत. म्हणजेच चार वेळा संसर्ग होण्याची शक्यता असते.