Motorola Smartphones : Moto E22s स्मार्टफोन आज भारतात लॉन्च झाला आहे. एंट्री-लेव्हल श्रेणीत येणाऱ्या कंपनीच्या E मालिकेतील ही नवीनतम भर आहे. स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे.
याशिवाय फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबत 4GB रॅम देण्यात आली आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच फोनची बॅटरी 5000mAh आहे. फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व माहिती पुढीलप्रमाणे…

Moto E22s किंमत
कंपनीने Moto E22s ची किंमत 8,999 रुपये निश्चित केली आहे. हा फोन आर्कटिक ब्लू आणि इको ब्लॅक या दोन कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची विक्री 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
Moto E22s Specifications
-6.5 इंच HD डिस्प्ले
-90Hz रिफ्रेश रेट
-MediaTek Helio G37 प्रोसेसर
-16MP प्राथमिक कॅमेरा
-5000mAh बॅटरी
Fluid, stylish and super-performer- It’s the #motoe22s. Enjoy a Brilliant 90Hz Display, a stylish Premium Design, 16MP AI Camera, easy access with Side Fingerprint Sensor, Android™ 12 & much more at just ₹8,999. Sale starts 22nd October on @flipkart & at leading retail stores
— Motorola India (@motorolaindia) October 17, 2022
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Motorola च्या या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. तसेच डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Moto E22s फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअपचा प्राथमिक कॅमेरा 16MP आहे. यासोबत 2MP दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP कॅमेरासह येतो.
फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. एका चार्जवर हा फोन 2 दिवस वापरता येईल असा कंपनीचा दावा आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग मिळते.