मी आमदार झाल्यामुळेच मतदारसंघात पाऊस झाला; असे नाही म्हटले म्हणजे बरं ….?

Published on -

Ahmednagar News:जी विकास कामे आम्ही मंजूर केली होती ती विकास कामे महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच आता उगवणार आहे. अडीच वर्षात काय विकास केला याचा अगोदर हिशोब द्या.

आम्ही किती विकास केला याचा हिशोब द्यायला आम्ही कधीही तयार आहोत.एकीकडे धरण भरली, नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि’ हे’ लोकप्रतिनिधी जलपूजनचे करून प्रसिद्धी मिळवत आहेत.

बरं झालं मी आमदार झाल्यामुळेच मतदारसंघात पाऊस झाला असे म्हटले नाहीत. अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली. पुढे बोलताना माजी आ. कर्डिले म्हणाले जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून सेवा संस्थांसह साखर कारखान्यांना देखील आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्यांना देखील मदतीचा हात दिला आहे. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर लगेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची कर्जमाफी केली.

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने केवळ घोषणा केल्या मात्र हे राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे त्यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe