Ola S1 Air electric scooter : Ola च्या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरची (Ola electric scooter) ग्राहक अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ग्राहकांची प्रतीक्षा आज संपली (Electric scooter) आहे.
कंपनीने (Ola) आज नवीन Ola S1 Air (Ola S1 Air) इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. Ola ची ही सर्वात स्वस्त स्कुटर (Ola cheap electric scooter) असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

किंमत आणि बुकिंग
नवीन 2022 Ola S1 Air व्हेरियंटची किंमत 79,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे कंपनीच्या OLA S1 पेक्षा 20,000 रुपये आणि S1 Pro पेक्षा 50,000 रुपये स्वस्त आहे. मात्र, ही किंमत खास दिवाळीसाठी (Diwali) असून 24 ऑक्टोबरपर्यंत वैध आहे.
यानंतर किंमत 84,999 रुपये होईल. हे 999 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केले जाऊ शकते. स्कूटरची डिलिव्हरी पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सुरू होईल.
A scooter for everyday, a scooter for everyone. The most awaited Ola S1 Air is here at an introductory price of Rs. 79,999! Offer valid till 24th October only. Hurry! Reserve now for Rs. 999 🥳🥳 pic.twitter.com/KmV0DGRs3Z
— Ola Electric (@OlaElectric) October 22, 2022
बॅटरी आणि रेंज
नवीन Ola S1 Air मध्ये 2.5 kWh बॅटरी पॅक आहे. याला 101KM ची ARAI-प्रमाणित श्रेणी मिळेल. जरी वास्तविक जगात 76 किमी. रेंजचा दावा केला जात आहे. त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ते फक्त 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवते. स्कूटरसोबत 500W पोर्टेबल चार्जर देण्यात आला आहे, ज्याद्वारे ती 4.5 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
फीचर्स
या स्कूटरला कंपनीच्या बाकीच्या मॉडेलपेक्षा थोडे वेगळे डिझाइन देण्यात आले आहे. यात ड्युअल-टोन पेंट फिनिश, नवीन रीअर ग्रॅब हँडल्स आणि अपडेटेड सिंगल-सीटसह नवीन फ्लॅट फूटबोर्ड मिळतो.
याशिवाय स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड, साइड स्टँड अलर्ट, इको आणि स्पोर्ट्स मोड, म्युझिक प्लेबॅक आणि 34 लीटर बूट स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.