iPhone 13 Pro : जगभरात आयफोन प्रेमी (iPhone lovers) खूप आहेत. आपल्याकडेही एखादा आयफोन (iPhone) असावा असे प्रत्येकाला वाटत असते. दिवाळीच्या सेलमध्ये (Diwali sale) आयफोनच्या काही मॉडेल्सवर भरघोस सवलत मिळत होती.
iPhone 13 सीरिज (iPhone 13 series) या सेलमध्ये खूप कमी किमतीत विकला गेला होता. अशातच पुन्हा एकदा iPhone 13 Pro वर भरघोस सवलत (iPhone 13 Pro Offer) मिळत आहे.
iPhone 13 Pro ऑफर आणि सवलत
iPhone 13 Pro (128GB) ची लॉन्चिंग किंमत 1,19,900 रुपये आहे. परंतु Amazon (Amazon) वर 1,09,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोनवर (iPhone 13 Pro) 10 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतरही, अनेक ऑफर्स आहेत, ज्यामुळे फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.
iPhone 13 Pro एक्सचेंज ऑफर
iPhone 13 Pro वर 14,050 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. परंतु तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल तरच रु. 14,050 चा फुल ऑफ मिळेल. जर तुम्ही फुल ऑफ मिळू शकलात तर फोनची किंमत 95,850 रुपये असेल.
आयफोन 13 प्रो बद्दल विशेष गोष्टी
iPhone 13 Pro मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे. विजेच्या वेगवान कामगिरीसाठी A15 बायोनिक चिप वापरण्यात आली आहे. मागील बाजूस तीन 12MP लेन्स आणि समोर 12MP सेल्फी लेन्स आहेत. फोटोग्राफीसाठी हा फोन सर्वोत्तम मानला जातो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, फोन पूर्ण चार्ज केल्यावर दिवसभर आरामात चालू शकतो.