अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही, तर कोरोना महामारीविरुद्ध लढण्याची वेळ आहे.
त्यामुळे या वर्षी १४ एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया. असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी ५ जणांना प्रशासनाने द्यावी.
१४ एप्रिलला आपल्या घरावर निळा झेंडा लावून, बाहेर जाहीर कार्यक्रम मिरवणूक न काढता घरी राहूनच मिठाई, पुरणपोळी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भीमजयंती साजरी करावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. दरवर्षी १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होते.
यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढीपाडव्याच्याही शोभायात्रा रद्द झाल्या आहेत. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत आणि घरीच राहावे, असेही ते म्हणाले. त्यासाठी ‘आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वत:चे भक्षक’असे काव्यात्मक आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com