Soybean Market : हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी हमीभाव केंद्रे बंदच ; हमीभाव केंद्रे फक्त प्रदर्शनासाठी ठेवलेत का? शेतकरी संतप्त

Published on -

Soybean Market : सोयाबीन हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. मात्र अजूनही सोयाबीनच्या बाजारभावात फारशी सुधारणा पाहायला मिळत नाही. सोयाबीनला जरूर सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे. मात्र सरासरी बाजारभावाचा विचार केला तर अजूनही सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या खालीच पाहायला मिळत आहेत.

जाणकार लोकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला अपेक्षित अशी मागणी नसल्याने तसेच भारतातून सोया पेंड निर्यात खूपच कमी प्रमाणात होत असल्याने सोयाबीन बाजारभावात घसरण झाली आहे. याशिवाय वायदे बंदीमुळे देखील सोयाबीन दरात घसरण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने सोयाबीन व सोयातेलावर लावलेले स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. त्यामुळे सोयाबीन दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना त्यामध्ये अजून वाढ होण्याची आशा आहे.

दरम्यान यावर्षी राज्यातील बहुतांशी ठिकाणी हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी देखील सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू नसल्याचे चित्र आहे. मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातही सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नाहीत. खरं पाहता सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात एकूण 17 हमीभाव केंद्रे सूरु केली जातात. मात्र यावर्षी एकही हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही. पाहता हमीभाव केंद्रे शेतकरी बांधवांना हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळू नये यासाठी सुरू केले जातात आणि हमीभाव केंद्राच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केला जातो.

साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र आता हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी देखील जिल्ह्यात एकही हमीभाव केंद्र सुरू झाले नसल्याने हमीभाव केंद्रे फक्त प्रदर्शनासाठी सुरू केली आहेत का असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत. दरम्यान शासनाकडून सेंटर आयडी आणि पासवर्ड आलेले नसल्याने हमीभाव केंद्र सुरू झालेले नाहीत, अशी माहिती मीडिया रिपोर्ट मध्ये समोर येत आहे. हमीभाव केंद्राबाबत अजून कोणताही आदेश आलेला नसल्याने हमीभाव केंद्र सुरू झालेले नाही तसेच सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी देखील सुरू झालेली नाही.

मित्रांनो खरं पाहता हमीभाव केंद्र सुरू झाले नसल्याने खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून सोयाबीन ओले असल्याचे कारण पुढे करत सोयाबीन बाजारभाव कमी करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सोयाबीन दराला आधार मिळण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू होण्याची आवश्यकता आहे. सध्या हमीभाव केंद्र सुरू नसल्याने शेतकरी बांधव खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करत आहेत. दरम्यान जाणकार लोकांच्या मते येत्या काही दिवसात सोयाबीन मधील ओलावा कमी झाल्यानंतर हमीभाव केंद्र सुरू होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe