Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Good News : महागाईत दिलासा ! ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता ग्राहकांना होणार ‘इतका’ फायदा

Saturday, November 5, 2022, 9:19 PM by Ahilyanagarlive24 Office

Good News :  काही दिवसापूर्वीच आरबीआयने रेपो दारात वाढ केली होती. यामुळे आता अनेक बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी घेतलेला या निर्णयामुळे काहींना मोठा दिलासा मिळाला आहे.

याचा मुख्य कारण म्हणजे आता पर्यंत अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. दरम्यान, खासगी क्षेत्रातील Axis Bank ने मुदत ठेवींवर म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. Axis Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर वाढवले आहेत.

बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 5 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने 46 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 115 bps पर्यंत वाढ केली आहे. Axis Bank आता सर्वसामान्यांसाठी 3.50% ते 6.50% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% ते 7.25% पर्यंत 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीत ठेवींवर व्याज देत आहे. 3 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवरील कमाल व्याजदर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25% आणि सर्वसामान्यांसाठी 6.50% असेल.

Axis Bank चे नवीन एफडी दर

7 दिवस ते 45 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या FD वर 3.50% व्याजदर मिळत राहतील, परंतु 46 दिवस ते 60 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर बँकेने व्याजदर 3.50% वरून 4% केला आहे. 61 दिवस ते 3 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर आता 4.50% व्याजदर दिला जाईल. 3 महिने ते 6 महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर आता 4.50% व्याजदर दिला जाईल. अॅक्सिस बँकेने 6 महिने ते 9 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर 50 bps वरून 5.50% आणि 9 महिने ते 1 वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 75 bps वरून 5.75% पर्यंत वाढवले आहेत.

RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे

विशेष म्हणजे देशातील वाढती महागाई रोखण्यासाठी आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. आता रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयच्या 30 सप्टेंबर रोजी झालेल्या एमपीसीच्या बैठकीत, सलग चौथ्यांदा रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर जून आणि ऑगस्टमध्ये 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ झाली होती.

अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत

उल्लेखनीय आहे की अलीकडेच आरबीएल बँक, अॅक्सिस बँक, सीएसबी बँक लि., कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक इत्यादींनीही त्यांचे एफडी दर वाढवले आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

हे पण वाचा :-  Personal Loan: अरे वा .. आता पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवायही मिळणार वैयक्तिक कर्ज ; फक्त ‘या’ पद्धतींचा करा अवलंब

Categories ताज्या बातम्या, आर्थिक, भारत Tags Axis Bank, Axis Bank Account, Axis bank card, Axis Bank FD rate, Axis Bank fd rate hike, Axis Bank latest update, Axis Bank news, Axis Bank update, Good News
Personal Loan: अरे वा .. आता पॅन कार्ड आणि सॅलरी स्लिपशिवायही मिळणार वैयक्तिक कर्ज ; फक्त ‘या’ पद्धतींचा करा अवलंब
Smartphones Under 10000 : 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये घरी आणा ‘ह्या’ दमदार स्मार्टफोन ; जाणून घ्या त्याची खासियत
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress