Sanjay Raut Bail : शिवसेना खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. संजय राऊतसोबतच न्यायालयाने प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये अटक केली होती.
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोलापुरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तोफ पुन्हा रणांगणात असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते उगाच नाव लावून फिरत नाहीत, त्यांनी मुखवटा लावलेला नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहेत असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. दबावतंत्र वापरुन, यंत्रणांची मदत घेऊन आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे, भाजप सरकार हुकूमशाही करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, संजय राऊत डरपोक नाहीत. संजय राऊत हे गद्दार नाहीत. संजय राऊत यांच्याविरोधातही दबाव तंत्र वापरण्यात आले होते. पण ते पळून गेले नाहीत.
आज राजकीय लोकांवर दबावतंत्र वापरुन कारवाई होतेय. उद्या पत्रकारांवर, लोकांवरही अशाच प्रकारे कारवाई होऊ शकते. ही धोक्याची घंटा आहे.
संजय राऊत यांना १०२ दिवसानंतर जामीन मिळाला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याअगोदरही संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी आर केला होता मात्र राऊत यांना जामीन मिळाला नव्हता.