Gajanan Kirtikar : शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार; गजानन कीर्तिकरांचा आरोप

Published on -

Gajanan Kirtikar : राज्यात एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेनेला गळती सुरु झाली आहे. गजानन कीर्तिकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

शिवसेनेमध्ये असताना गजानन कीर्तिकर यांचे उद्धव ठाकरे यांनी तिकीट कापण्याचा कसा प्रयत्न केला होता हेही सांगितले आहे. कीर्तिकर म्हणाले, मी 56 वर्ष शिवसेनेसोबत आहे. ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी 2004 मध्ये माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला.

व्हि के सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर आहे. त्याचा भाऊ रमेश सिंह आहे. त्याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची गुफ्तगू सुरू होती.

काय गुफ्तगू सुरू होती मला माहीत आहे. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिले नाही. मला तिकीट दिले, असा गंभीर आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

पुढे बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले, मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिले. त्यानंतर 2009मध्ये माझा पत्ताच कट केला. मला उमेदवारी दिली नाही. सुनील प्रभू म्हणून माझा पीए आहे.

त्याला सारखं बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही. तू कामाला लाग असे सांगितले गेले. काय चालले आहे. एवढा मोठा पक्षप्रमुख असा विचार करतो?अशी खंत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.

शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो. पण आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा अपमान होत होता. 2019ला आम्ही एनडीएसोबत होतो. आम्हाला मंत्रिपद मिळाले.

पण ते अरविंद सावंतला दिले. तुमची खासगी माणसं आणि तुमच्या मर्जीतल्या माणसाला दिले. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News