Sushama Andhare : ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकार चार सहा महिन्यात कोसळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sushama Andhare : राज्यातील सरकार चार सहा महिन्यात कोसळणार असल्याचे वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मध्यावधी लागणार असल्याचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे गटाला पळो की सळो करून सोडणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याबाबत शिंदे गटाने आज मोठी केली आहे. सुषमा अंधारे यांचे विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटात सामावून घेतले आहे.

तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकाच दिवशी सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केल्याने राज्यात मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत वक्तव्य केले आहे. शिंदे गटातील आमदार सुहास कांदे नाराज असल्याची चर्चा सध्या शिंदे गटात फूट पाडणार का? अश्या प्रश्नांना तोंड फुटले आहे.

सुहास कांदे यांनी थेट दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांच्या दालनातून रागारागाने बाहेर पडले होते. प्रत सरनाईक यांनी चौकशी टाळण्यासाठी पक्ष बदलला आहे मात्र त्यांच्यामागील चौकशी काही थांबलेली दिसत नाही.

सुषमा अंधारे म्हणाल्या, सरनाईक त्यांचा मतदारसंघ भाजपला सोडत नाही, तोपर्यंत भाजप त्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ देणार नाही. या सर्व कारणाने हे सरकार कोणत्या दिशेने जातंय हे स्पष्ट होतंय असे अंधारे म्हणाल्या आहेत.

तसेच सरकार कोसळणार असल्याचे खबळजनक भाकीत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्या म्हणाल्या, हे असंच कुरघोड्यांचं राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचं राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल.