Business Idea : तुमचेही बदलेल हिरव्या सोन्याच्या व्यवसायाने नशीब, कमी कष्टात बनाल लखपती

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : देशातील अनेक लोक शेतीद्वारे आपली आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु, अनेकजण शेतीत तोटा होत असल्याने नोकरी करतात. तुम्ही आता शेतीद्वारे बक्कळ पैसे कमावू शकता.

जर तुम्हाला कमी मेहनतीत आणि कमी गुंतवणुकीत श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही बांबूची शेती करू शकता.विशेष म्हणजे सरकार यासाठी अनुदान देत आहे. यालाच हिरवे सोने असेही म्हणतात.

इतर पिकांच्या तुलनेत बांबूची लागवड अत्यंत सुरक्षित मानली जाते, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच यातून खूप चांगले उत्पन्नही मिळू शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही हवामानात खराब होत नाही.

बांबू पिकाची एकदा लागवड केल्यास त्यातून अनेक वर्षे नफा मिळवता येतो. बांबू लागवडीसाठी लागणारा खर्च आणि मजूर कमी आहे. ओसाड जमिनीतही लागवड करता येते.

बांबूची रोपे कोणत्याही रोपवाटिकेतून खरेदी करून लावता येतात. त्याच्या लागवडीसाठी जमीन तयार करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा की माती जास्त वालुकामय नसावी. 2 फूट खोल आणि 2 फूट रुंद खड्डा खोदून बांबूची लागवड करता येते.

त्यानंतर शेणखत टाकता येते.रोपे लावल्यानंतर ताबडतोब पाणी द्या आणि एक महिना दररोज पाणी द्या. 6 महिन्यांनी आठवड्यातून पाणी द्यावे. एक हेक्टर जमिनीत 625 बांबू रोपे लावता येतात. बांबूचे रोप अवघ्या तीन महिन्यांत वाढू लागते. बांबूच्या झाडांची वेळोवेळी छाटणी करावी लागते. बांबूचे पीक 3-4वर्षात तयार होते.

वापर

या पिकासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते. कागद बनवण्याबरोबरच सेंद्रिय कपडे बनवण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. यासोबतच अनेक सजावटीच्या वस्तूंसाठीही बांबूचा वापर केला जातो.

कमाई

बांबूचे पीक 40 वर्षे टिकते. कापणीनंतरही ते पुन्हा वाढतात. बांबूच्या काड्या विकून वर्षाला 4-5 लाख रुपये कमावता येतात. याशिवाय लाकडाचा वापर करून अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात.

यामुळे तुमचा नफा अनेक पटींनी वाढेल. बांबूच्या लागवडीसोबत तीळ, उडीद, मूग-हरभरा, गहू, बार्ली किंवा मोहरी ही पिके घेता येतात. त्यामुळे उत्पन्न वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe