अहमदनगर,औरंगाबाद, नाशिक, बीड,सोलापूर, आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.अहमदनगर/पुणे-सोलापूरकडून मनमाड कडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी राहुरीकडे न येता अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जावे.

मनमाड – येवला – शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई/ कल्याण कडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा, झगडे फाटा (रा.म.मा.क्र.१६० ब)-सिन्नर (रा.म.मा.क्र.१६०)सिन्नर-नांदुर शिंगोटे-संगमनेर आळेफाटा मार्ग वळविण्यात येणार आहे.

मनमाड- येवला कडून अहमदनगर / सोलापूर / बीड कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापूर- गंगापूर मार्ग -कायगाव- प्रवरासंगम -शेंडी बायपास -विळद घाट – केडगाव बायपास मार्ग वळविण्यात येणार आहे.

तसेच लोणी / बाभळेश्वर / श्रीरामपूर कडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर- श्रीरामपूर -टाकळीमान – नेवासा मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहे. या पर्यायी मार्गातून ऊस वाहतूक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रक्टर व अन्य वाहने) यांना सूट देण्यात आलेली आहे. असे प्रसिध्दीस दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.