Coriander Farming : बातमी कामाची ! नोव्हेंबर मध्ये कोथिंबिरीच्या ‘या’ जातीची पेरणी करा ; लाखोत कमाई सहजच होणार

Ajay Patil
Published:

Coriander Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत आहेत. यासोबतच शेतकऱ्यांकडून भाजीपाला शेती करण्यासाठी देखील तयारी जोरावर सुरू आहे.

रब्बी हंगामात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीतून अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात मोठी कमाई करू शकणार आहेत. आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कमी कालावधीमध्ये तयार होणाऱ्या कोथिंबीर पिकाच्या शेती विषयी काही महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कोथिंबीरीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांची पेरणी नोव्हेंबर महिन्यात केल्यास शेतकरी बांधवांना अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये मोठे कमाई होण्याची शक्यता असते. खरं पाहता अलीकडे शेतकरी बांधव कमी कालावधीत आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे अधिक वळला आहे.

यामध्ये कोथिंबीर पिकाचा देखील समावेश होतो. या पिकाच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे पीक काढण्यासाठी अवघ्या दोन महिन्यात तयार होते. यामुळे या पिकाच्या सुधारित जातींची पेरणी शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कोथिंबीर पिकाच्या नोव्हेंबर महिन्यात पेरल्या जाणाऱ्या काही जातींची माहिती जाणून घेणार आहोत.

कोथिंबिरीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे 

गुजरात धणे – 2 :- कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीच्या कोथिंबीर पिकात फुटवे अधिक राहतात. या जातीची पेरणी झाल्यानंतर 110-115 दिवसात कोथिंबीर काढणीसाठी तयार होत असते. जाणकार लोकांच्या मते, या जातीपासून 1500 किलो प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. या जातीची पाने मोठी आणि छत्रीच्या आकाराची असतात.

साधना :- आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही कोथिंबिरीची एक सुधारित जात आहे. कोथिंबीरीची ही जात पेरणीनंतर 95-105 दिवसात काढणीसाठी तयार होते. या जातीचे उत्पादन 1000 किलो प्रति हेक्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

स्वाती :- कोथिंबिरीची ही जात एपीएयू, गुंटूर यांनी विकसित केली आहे. या जातीची धने पिकण्यास 80-90 दिवस लागतात. ही जात 885 किलो प्रति हेक्टर उत्पादन देऊ शकते.

राजेंद्र स्वाती :- कोथिंबिरीची ही जात ११० दिवसांत पिकल्यानंतर तयार होते. कोथिंबिरीची ही जात आरएयूने विकसित केली आहे. ते 1200-1400 किलो प्रति हेक्टर उत्पादन देते.

गुजरात -१ :- या जातीच्या बिया जाड आणि हिरव्या रंगाच्या असतात. त्याचा पिकण्याचा कालावधी 112 दिवस असून ते प्रति हेक्‍टरी 1100 किलो उत्पादन देऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe