7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खूशखबर आहे.
केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. घरे बांधण्यासाठी बँकांकडून घेण्यात आलेल्या गृहकर्जावर व्याजदरात मोठी कपात केली आहे.सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आता स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
केंद्र सरकारने गृहनिर्माण कर्जावरील व्याजदरात 0.8 टक्के कपात केली आहे. या कपातीनंतर गृहनिर्माण कर्ज 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर आले आहे. ही कपात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचारी आता बँकेकडून स्वस्त दरात गृहकर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
या योजनेप्रमाणे केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनानुसार 34 महिन्यांपर्यंत किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अॅडव्हान्स घेऊ शकतात. याशिवाय घराची किंमत किंवा कर्ज फेडण्याच्या क्षमतेच्या आधारेही आगाऊ रक्कम घेता येते.