E-Commerce : तुम्ही देखील या हिवाळ्यात तुमच्या घरासाठी गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि नवीन आयफोन देखील खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला सांगतो हीच ती योग्य वेळ आहे.
सध्या इंटरनेटवर अनेक ई-कॉमर्स साइट्स आहे जे तुम्हाला स्वस्तात आयफोन आणि गीझर देणार आहे. भारतात बहुतेक लोक आज ऑनलाईन शॉपिंगसाठी फ्लिपकार्टचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या साइट्सबद्दल माहिती देणार आहोत त्या साइट्सवर फ्लिपकार्टपेक्षा ही तुम्ही स्वस्तात शॉपिंग करू शकतात. चला तर जाणून घेऊया त्या साइट्सबद्दल संपूर्ण माहिती.
IndiaMART
IndiaMART हे B2B मार्केटप्लेस आहे. याबाबत अनेकांना माहिती नाही. यामध्ये तुम्ही थेट पुरवठादारांशी संपर्क साधू शकता. म्हणजेच तुम्ही थेट कनेक्ट करून वस्तू मागवू शकता. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल मशिनरी, पोशाख, इलेक्ट्रॉनिक्स यासह अनेक गोष्टी येथे उपलब्ध आहेत. येथून तुम्ही आयफोन किंवा कोणतीही अॅक्सेसरीज सहज खरेदी करू शकता. तसेच इथे तुम्हाला Refurbish iPhone देखील मिळू शकतो.
Meesho
मीशो हा एक चांगला पर्याय देखील सिद्ध होऊ शकतो. येथून तुम्ही कोणतीही वस्तू सहज खरेदी करू शकता. Meesho हे ऑनलाइन पोर्टल असूनही अद्याप अनेकांना याची माहिती नाही. जर तुम्ही काही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या पोर्टलवर तुम्हाला जलद डिलेव्हरीचा पर्यायही दिला जातो.
Snapdeal
स्नॅपडीलवरून वस्तू खरेदी करूनही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. येथून तुम्हाला अनेक गोष्टी स्वस्तात मिळू शकतात. स्नॅपडील ही एक ई-कॉमर्स साइट देखील आहे, येथून लोक अनेक वस्तू खरेदी करतात. तुम्ही गीझर आणि आयफोन सारखे काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही येथून सहज खरेदी करू शकता. त्यातून अनेक वस्तू अतिशय स्वस्तात विकल्या जात आहेत. येथून इलेक्ट्रिक गीझर देखील अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे.
हे पण वाचा :- Central Government : खुशखबर ! खात्यात जमा होणार 1000 रुपये ; ‘या’ लोकांना मिळणार लाभ