Kia Seltos Facelift : किआ मोटर्स ही कोरियन वाहन उत्पादक कंपनी असली तरी किआने आपली भारतीय बाजारात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारात किआची सेल्टॉस ही कार चांगली कामगिरी करत आहे.
किया आता हीच कार अपडेट करत आहे. कंपनी लवकरच Kia Seltos फेसलिफ्ट म्हणून लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या कार्सचे नवीन डिझाइन आणि फीचर्स कशी असतील ते जाणून घेऊयात.
इंजिन कसे आहे
कंपनीने नवीन सेलटोस अमेरिकेच्या बाजारपेठेत सादर केले आहे. ज्यामध्ये 1.6-लिटर T-GDI टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनसह, एसयूव्ही 195 हॉर्स पॉवर निर्माण करण्यास सक्षम असेल.
लूक आणि फीचर्स कशी आहेत
कंपनीने नवीन सेल्टोसला नवीन डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कंपनीने नवीन सेल्टोसमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प अशा अनेक भागांमध्ये बदल केले आहेत. यासोबतच यात नवीन अलॉय व्हील्सही देण्यात आले आहेत.
एसयूव्हीमध्ये नवीन प्लूटन ब्लू कलरही देण्यात आला आहे. एक्सटीरियर व्यतिरिक्त, इंटीरियरमध्ये 10.25-इंचाचा पॅनोरॅमिक डिस्प्ले देण्यात आला आहे. तितकीच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमही देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने हे देखील सांगितले आहे की सेल्टोसचा नवीन X लाइन प्रकार देखील आणला जाईल.
हे बदल भारतीय व्हर्जनमध्ये होतील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत सादर केलेल्या सेलटोसच्या नवीन आवृत्तीचे अनेक फीचर्स भारतातही आणले जातील. Seltos चे फेसलिफ्ट व्हेरिएंट कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात लॉन्च करू शकते.
यामध्ये अमेरिकन सेल्टोसच्या अनेक वैशिष्ट्यांसह नवीन डॅशबोर्ड, नवीन स्टीयरिंग व्हील, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, उत्तम टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एडीएएस सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.
SUV ने मोठी उपलब्धी मिळवली
सेल्टोस तीन वर्षांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता. सेल्टोस लाँच झाल्यापासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सेल्टोसची विक्री खूप वेगवान झाली आहे आणि केवळ तीन वर्षांत तीन लाख युनिट्सची विक्री झाली आहे.
किंमत किती आहे
सेल्टोसची भारतातील एक्स-शोरूम किंमत 10.59 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार HTE, HTK, HTK+, HTX, HTX+, GTX(O) आणि GTX+ व्हेरियंटमध्ये ऑफर केली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 16.99 लाख रुपये आहे.