2022 Tata Tigor EV : टाटा मोटर्सने Tata Tigor EV भारतीय बाजारपेठेत प्रीमियम वैशिष्ट्यांसह लॉन्च केली आहे. यामध्ये आता तुम्हाला अधिक रेंजसह अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. 2022 Tigor EV चार प्रकारांमध्ये विकली जाईल, जसे की, XE, XT, XZ आणि XZ Lux. कंपनी सध्याच्या Tigor EV मालकांसाठी सॉफ्टवेअर अपडेटद्वारे मोफत फीचर अपडेट पॅक ऑफर करत आहे.
ग्राहक त्यांची इलेक्ट्रिक वाहने मल्टी-मोड रीजनरेशन, iTPMS आणि टायर पंक्चर दुरुस्ती किटसह अपग्रेड करू शकतात. याव्यतिरिक्त, विद्यमान XZ आणि XZ DT ग्राहकांना स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी अपग्रेड देखील मिळू शकते. 20 डिसेंबर 2022 पासून टाटा मोटर्सच्या कोणत्याही अधिकृत सेवा केंद्राला भेट देऊन या सेवेचा लाभ घेता येईल.
नवीन Tata Tigor EV किंमत
Tata Tigor EV: रु. 12.49 लाख (एक्स-शोरूम)
Tata Tigor EV XT: रु 12.99 लाख (एक्स-शोरूम)
Tata Tigor EV XZ: Rs 13.49 लाख (एक्स-शोरूम)
टाटा टिगोर EV XZ LUX: रुपये 13.75 लाख (एक्स-शोरूम)
2022 Tata Tigor EV ची नवीन वैशिष्ट्ये
Tigor EV च्या नवीन फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर आता तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळतील. याशिवाय मल्टी-मोड रिजन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी- ZConnect, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, ITPMS आणि टायर पंक्चर रिपेअर किटची सुविधाही देण्यात आली आहे. कॉस्मेटिक अपग्रेडमध्ये नवीन मॅग्नेटिक रेड कलर स्कीम समाविष्ट आहे, जी आधीच ICE-चालित टिगोरवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, आतील भागात आता लेदरेट अपहोल्स्ट्री आणि लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील मिळते.
2022 Tata Tigor EV रेंज
टिगोर ईव्हीच्या श्रेणीतही सुधारणा करण्यात आली आहे. सध्याच्या Tigor EV ची रेंज 306 किमी आहे, तर अपग्रेड केलेली Tigor EV पूर्ण चार्ज केल्यावर तुम्हाला 315 किमीची रेंज देईल. बॅटरी पॅक IP67 रेट केलेला आहे म्हणजे त्यावर धूळ आणि पाण्याचा परिणाम होणार नाही. त्याची बॅटरी क्षमता 26 kWh आहे. Tigor EV वरील इलेक्ट्रिक मोटर 75 ps कमाल पॉवर आणि 170 Nm कमाल टॉर्क निर्माण करते. टाटा मोटर्स सध्या भारतीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वाहन विभागात आघाडीवर आहे. कंपनीकडे इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी लाइनअप आहे. टाटा मोटर्सच्या EV पोर्टफोलिओमध्ये Tigor EV, Tiago EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max यांचा समावेश आहे.