Google Messages : गुगल आणत आहे जबरदस्त फीचर! वापरकर्त्यांना पाठवता येणार ‘असा’ मेसेज

Ahmednagarlive24 office
Published:

Google Messages : आपल्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी Google सतत नवीन फीचर्स आणत असते. असेच एक जबरदस्त फिचर गुगलने आणले आहे.

या फीचरमुळे वापरकर्त्यांना चॅटिंग करताना दुप्पट मज्जा येईल. हे नवीन फिचर मेसेज संदर्भात आहे. या नवीन फीचरमुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मेसेजवर आता इमोजीसह उत्तर देऊ शकाल.

सध्या, काही बीटा वापरकर्त्यांना Google Messages वर ही प्रतिक्रिया इमोजी मिळत आहे, परंतु लवकरच ते सर्वांसाठी रिलीज केले जाईल. इमोजी प्रतिक्रियेसह एक मेनू देखील दिसेल, ज्यावर क्लिक करून बरेच इमोजी निवडले जाऊ शकतात.

नवीन फीचर त्या अँड्रॉईड फोनसाठी नसेल ज्यात कस्टम UI आहे. हे वैशिष्ट्य फक्त स्टॉक अँड्रॉइड किंवा गुगल मेसेजेस अॅपवर उपलब्ध असेल. याआधी गुगलने गुगल मेसेजेससाठी पिन चॅट हे फीचर देखील जारी केले आहे.

Google Messages देखील आता एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहे, याचा अर्थ फक्त तुम्ही पाठवलेला संदेश वाचू शकतो. एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांसारख्या अॅप्समध्ये आधीपासूनच आहे आणि ट्विटरचे डायरेक्ट मेसेजही एनक्रिप्ट करण्याची चर्चा आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, ट्विटर संदेश देखील एन्क्रिप्ट केले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe