Maharashtra : स्वतंत्र विदर्भ- मराठवाड्याची मागणी करत सदावर्तेचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

Published on -

Maharashtra : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातले सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशातच आता ॲड. गुणवंत सदावर्ते यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वैचारिक वारस आहे असे सांगत स्वतंत्र मराठवाडा आणि स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पवार आणि ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

बोलताना ते म्हणाले की, मानवी विकास होण्यासाठी स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाडा झालाच पाहिजे. त्यांच्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्यानंतर त्यांनी पवार आणि ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याबाबत तुमचे मत काय प्रश्न उपस्थित करण्यात आला.

बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवीन वक्तव्य केले असतानाच सदावर्ते यांच्या मागणीमुळे आणखी राज्याचे वातावरण तापू शकते. दरम्यान सदावर्ते यांनी केलेल्या टीकेला पवार आणि ठाकरे कशाप्रकारे उत्तर देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe