Maharashtra : कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार? अजित पवारांच्या टोमण्याला केसरकराचं उत्तर म्हणाले, … बळी देणार

Published on -

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार आज गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे शिंदे गटावर विरोधी पक्षनेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनीही शिंदे गटाला टोला लगावला आहे. कामाख्या देवीसाठी कोणाचा बळी देणार? असा चिंता अजित पवारांनी काढला आहे.

अजित पवार यांच्या या टीकेला शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या विचारांचा बळी देणार आहोत. महाराष्ट्राचा खूप विकास व्हावा, अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत.

अतिवृष्टी, वेगवेगळे रोग होतात, या अरिष्टांचा बळी कामाख्या देवीने घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखी करावं, एवढीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही कामाख्या देवीकडे जातोय. एक चांगले सरकार महाराष्ट्रात आले आहे, त्याबद्दलचा नवस फेडायला आम्ही जातोय, असे म्हणत दीपक केसरकरांनी अजित पवारांना उत्तर दिले आहे.

शिंदे गटाचे काही आमदार आणि खासदार या दौऱ्यासाठी गैरहजर आहेत. त्यावरून अनेक राजकीय चर्चा होत आहे. त्यालाही केसरकरांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार आणि सवडीनुसार येत असतो.

या दौऱ्यात अनेक आमदार आणि खासदार गैरहजर आहेत. यावरूनही राजकीय चर्चा सुरु आहे. पण केसरकर यांनी यावर प्रत्युत्तर दिलंय. प्रक्येकजण आपल्या सवडीने येत असतो. प्रत्येकाला ती वेळ सोयीची असेल असे नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तेव्हाच निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही जातोय.

कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला तिथे जातोय. आमची श्रद्धा आहे. भक्तीभावाने सगळे जातोयत. या राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या, जनता सुखी व्हावी, हाच अजेंडा आहे, याच प्रामाणिक भावनेतून आम्ही जातोय..

एकनाथ शिंदे यांनीही गुवाहाटी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो.

त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची अवश्यकता आहे, असे वाटत नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, आमची श्रद्धा आहे. आम्ही भक्तिभावाने जात आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांना दर्शन घेण्याचा उत्साह आहे. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.

राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना करणार आहे. ही प्रामाणिक भावना आहे. हाच आमचा अजेंडा आहे. बाकी काही दुसरा आमचा अजेंडा नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe