Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांकडून वारंवार चुकीची आणि वादग्रस्त विधाने केली जात आहेत. आताही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
विरोधी पक्षांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच ही भाजपनेच लिहलेली स्क्रिप्ट आहे असा आरोपही करण्यात येरत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. तसेच अजूनही संजय राऊत यांनी हा मुद्दा लावून धरला आहे.

संजय राऊत यांनी मिडिड्याशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी भाजपवर टीकादेखील केली आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अवमान केला जात आहे. भाजपकडून त्यांची वारंवार विटंबना केली जात आहे. त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
त्यामुळे संभाजी छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही या अवमाना विरोधात एकत्र यावं, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत राज्यपालांविरोधात आक्रमक असल्याचे दिसत होते. पुढे ते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजे भोसले यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे.
शिवसेना आणि महाविकास आघाडीने शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
भाजपकडून वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहे. त्यामुळे या सर्वांविरोधात सर्वांनी एकत्र यावे, असेही राऊत म्हणाले आहेत.