Land scams : आता जमिनीशी संबंधित फसवणुकीला बसणार आळा, करा ‘हे’ काम

Published on -

Land scams : सध्या जमिनीशी संबंधित फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे सावकार किंवा इतर लोक जमिनी फूस लावून आपल्या नावावर करतात. परंतु, आता प्रकाराला आळा बसणार आहे.

सरकारने या बाबत एक नवीन उपक्रम आणला आहे. आता जमिनीचे रिअल टाइम अपडेट करता येणार आहे. यासाठी सरकारने एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले असून शेतकऱ्यांसाठी याचा फायदा होईल.

पायलट प्रोजेक्ट म्हणून याची आता सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टसाठी गाझीपूर सदर, सीतापूरचे महोली, बाराबंकीचे सिरौली, गौसपूर, लखनौमधील मोहनलालगंज आणि शामली या तहसीलचा समावेश केलेला आहे.

आजही आपल्या भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना अजूनही खतौनीबद्दल माहिती नाही. खतौनी हा एक जमिनीच्या नोंदीचा प्रकार आहे. यामध्ये जमिनीशी संबंधित काही महत्त्वाचे तपशीलाचा खतौनीमध्ये समावेश आहे.

त्याचबरोबर जर चुकून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्या व्यक्तीची ती जमीन विकली तर ती जमीन त्या व्यक्तीच्या वारसदारांना किंवा खरेदीदाराकडे देण्यात येते.

यामध्ये 7 व्या ते 12 व्या स्तंभात जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती भरलेली असून ही माहिती पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये शोधून काढणे खूप अवघड होते. त्यामुळे आता नवीन येणाऱ्या सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News