Flipkart Black Friday Sale : जबरदस्त ऑफर.. !11,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा विवोचा शक्तिशाली स्मार्टफोन

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Black Friday Sale : फ्लिपकार्टवर सध्या ब्लॅक फ्रायडे सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्ही जबरदस्त फीचर्स असणारे महागडे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता.

या सेलमध्ये तुम्ही Vivo T1x (4GB+64GB) हा स्मार्टफोन 11,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 16,990 रुपये इतकी आहे. परंतु, सेलमधून तुम्ही तो स्वस्तात खरेदी करू शकता.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 2408×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6 GB पर्यंत रॅम तर 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. या फोनची विशेष बाब म्हणजे तुम्हाला 2 GB पर्यंत विस्तारित रॅम फीचर मिळत असून प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीचा विचार करायचा झाला तर या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 2-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा तर पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रंग

हा स्मार्टफोन Funtouch OS 12 वर काम करतो. रंगाचा विचार केला तर ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो तर कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, ओटीजी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असे पर्याय दिले आहेत.

जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन तुम्ही कमी किमतीत घरी नेऊ शकता. त्यामुळे तुमच्यासाठी ही स्वस्तात फोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe